बीड - बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. शनिवारी सकाळी बीड तालुक्यातील वाणगाव येथील एका ५५ वर्षीय इसमाचे गळफास घेतलेल्या अवस्थेतील प्रेत आढळून आले असून सदर आत्महत्या मराठा आरक्षणासाठी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
श्रीमंत भगवान जोगदंड हे मयत इसमाचे नाव आहे. त्यांचे प्रेत सकाळी गावापासून साधारण ५०० मीटर अंतरावर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांच्या खिशात मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा लिहलेली चिट्ठी आढळली आहे. त्यामुळे सदर आत्महत्या मराठा आरक्षणासाठी केल्याचे बोलले जात असून तसा अहवाल स्थानिक तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी दिला आहे.
बातमी शेअर करा