Advertisement

 'नेत्यांनो.. गाफील राहू नका, लोकसभेच्या तयारीला लागा

प्रजापत्र | Friday, 17/11/2023
बातमी शेअर करा

लोकसभेच्या जागा वाटप झाल्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर कोकणातील नेत्यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत जवळपास दोन तास चर्चा करण्यात आली. आजपासूनच निवडणुकीच्या कामाला लागा. गाफील राहू नका, असे आदेशच उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या जागा जवळपास निश्चित झाल्या आहेत. कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगडची जागा उद्धव ठाकरे गट लढवणार आहे. या दोन्ही जागा शिवसेनेच्यादृष्टीने महत्वाच्या आहेत. त्यामुळे ठाकरेंनी फिल्डिंग लावण्यास सुरवात केली आहे.

 

ठाकरे यांनी नुकतेच मातोश्रीवर घेतलेल्या बैठकीला खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, राजन विचारे, अनिल परब, रवींद्र वायकर, सुभाष देसाई, भास्कर जाधव, अनंत गीते आदी उपस्थित होते. पक्षप्रमुख ठाकरे यांनी बैठकीला आलेल्या नेत्यांशी संवाद साधला. राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले तसेच विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानेही मार्गदर्शन केले

Advertisement

Advertisement