Advertisement

 जालन्यात ओबीसींचा महाएल्गार; भुजबळ, वडेट्टीवार, जानकर सभास्थळी दाखल  

प्रजापत्र | Friday, 17/11/2023
बातमी शेअर करा

मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देऊ नयेत, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी आज जालन्यातील अंबडमध्ये भव्य ओबीसी सभा  आयोजित करण्यात आली आहे. या सभेला राज्यभरातील महत्त्वाचे ओबीसी नेते हजर राहणार आहेत. ओबीसी सभास्थळी भुजबळ, वडेट्टीवार आणि जानकर पोहोचले आहेत. त्यामुळे या सभेकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. सोबतच राज्यातील अनेक महत्वाचे ओबीसी नेते देखील या सभेला उपस्थित राहणार आहे. 

 

'या' आहेत प्रमुख मागण्या...
ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करु नये
बिहारच्या धर्तीवर राज्यात ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी
मराठा समाजाला दिलेली खोटी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करावी
खोटी बिंदू नामावली तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी
७ सप्टेंबर २०२३ रोजीचा कुणबी प्रमाणपत्रे देण्याचा जीआर रद्द करावा
बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करुन दाखल्यांचं वाटप करावं
धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी

 

Advertisement

Advertisement