Advertisement

 मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी नेमकं कोण?  

प्रजापत्र | Thursday, 16/11/2023
बातमी शेअर करा

जरांगे पाटील यांनी २४ डिसेंबरपर्यंत सरकारला आरक्षण देण्यासाठी वेळ दिला आहे. याविषयी बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की, अशा प्रकारचं आरक्षण कधीही मिळणार नाही. असली कोणतीही गोष्ट होणार नाही. हे मी जरांगे यांच्या तोंडावर सांगून आलो होतो. जरांगें पाटील यांच्या बोलवता धनी कोण आहे? हे पाहावं लागेल. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर मनोज जरांगे यांनी उत्तर दिलं आहे.

यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, राज ठाकरें यांनीच तो शोधून काढावा, आणि त्याचं नाव त्यांनी लवरकच स्पष्ट करावं, या पाठीमागं कोण आहे ते सगळ्यांनी शोधलं आहे. राज ठाकरेंनी पण शोधावं. आम्हाला पण सांगावं, त्यावेळी तुम्ही सांगाल ते आम्ही करतो. आम्हाला तर याचा शोध लागला नाही पण, यामागं फक्त आणि फक्त मराठा समाज आहे. मराठा सामाजाचं कल्याण व्हायला लागलं की, असे खोटे आरोप आणि पुड्या सोडल्या जातात. पंरतु मराठा समाज आता कोणाचंही ऐकणार नाही, मराठा समाजाला माहिती झालं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळणार आणि आम्ही ते मिळवणार असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

 

 

काय म्हणालेत राज ठाकरे?

मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की, अशा प्रकारचं आरक्षण कधीही मिळणार नाही. असली कोणतीही गोष्ट होणार नाही. हे मी जरांगे यांच्या तोंडावर सांगून आलो होतो. जरांगें पाटील यांच्या बोलवता धनी कोण आहे? हे पाहावं लागेल.

जरांगे पाटील आहेत की त्यांच्यामागून कोण आहे. जातीय वादातून महाराष्ट्रात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. निवडणुकीच्या पुढे हा वाद निर्माण करण्यात आला आहे. त्यामुळे मला या गोष्टी काही स्पष्ट वाटत नाहीत. कालातंराने कळेल की यामागे कोण आहे? असं राज ठाकरे म्हणाले.

Advertisement

Advertisement