Advertisement

सर्वसामान्यांना केंद्र सरकारची मोठी भेट!  

प्रजापत्र | Saturday, 11/11/2023
बातमी शेअर करा

  प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजना अंतर्गत केंद्र सरकार लाभार्थ्यांना आणखी दिलासा देण्याच्या तयारीत आहे. येत्या काही दिवसांत तुम्हाला आता एलपीजी गॅस सिलेंडरवर आणखी सूट मिळू शकते. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार उज्वला योजनेच्या  लाभार्थ्यांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे. सध्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षभरात १२ एलपीजी गॅस सिलेंडरवर ३०० रुपये सबसिडी मिळते. येत्या काही महिन्यांत उज्ज्वला योजनेंतर्गत अतिरिक्त सवलती देण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.

Advertisement

Advertisement