Advertisement

स्विमिंग कोचची गळफास घेऊन आत्महत्या

प्रजापत्र | Thursday, 24/12/2020
बातमी शेअर करा

बीड-येथील चंपावती क्रीडा मंडळातील एका बाथरूममध्ये स्विमिंग कोचने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.२४) सकाळी समोर आली.घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला.

           अक्षय कांबळे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्याने चंपावती क्रीडा मंडळातील एका बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.शिवाजी नगर पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करीत असून आत्महत्या मागचे कारण अद्याप समोर आले नाही.अक्षय हा गेल्या काही वर्षांपासून चंपावती क्रीडा मंडळ येथे स्वीमिंग कोच म्हणून प्रशिक्षण देत होता.

 

Advertisement

Advertisement