बीड- बेपत्ता झालेल्या पुतण्याचा शोध लागत नसल्याच्या नैराश्यातून चुलत्याने लिंबाच्या झाडाला सुताच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बीड पिंपळनेर रोडवरील बहिरवाडी शिवारात घडली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
बीड शहरातील पुरग्रस्त कॉलनीतील कचरू दगडू वडमारे (वय ७०) यांनी लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ९ वा. उघडकीस आली. मयत कचरू वडमारे यांचा पुतण्या किशोर गिज्ञानदेव वडमारे (वय ३० रा. पुरग्रस्त कॉलनी पिंपळनेर रोड, बीड) हा मागील आठ दिवसापुर्वी कामास जातो म्हणुन शेगाव येथे गेला होता. तो तेथून बेपत्ता झाल्याने त्याचा शोध घेतला मात्र तो मिळुन आला नाही. मात्र त्याच चिंतेत निराश होवून कचरू वडमारे (वय ७०) यांनी आत्महत्या केल्याची माहिती राजेंद्र दगडू वडमारे (वय ५२) यांनी पोलिसात दिली. या प्रकरणी राजेंद्र वडमारे यांच्या खबरेवरून बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पो.ना. जाधव करीत आहेत.