जळगाव- जळगावातील मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. चाळीसगाव तहसीलदारांना सकल मराठा समाजाकडून निवेदन देण्यात आले आहे. जे नेते आरक्षणासाठी लढले त्यांच्या जीवाचे बर वाईट झाले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी सकल मराठा समाजाने केल्याची माहिती समोर येत आहे.
बातमी शेअर करा