Advertisement

समिती आता राज्यभर काम करणार

प्रजापत्र | Saturday, 04/11/2023
बातमी शेअर करा

छत्रपती संभाजीनगर- कुणबी नोंदी तपासण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या शिंदे समितीची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. ही समिती आतापर्यंत मराठवाड्यातीलच नोंदी तपासत होती. मात्र, आता ही समिती राज्यभरातील कुणबी नोंदींची तपासणी करणार आहे. हा जीआर जारी होताच सरकारच्या शिष्टमंडळाने आज पुन्हा छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात जात मनोज जरांगेंची भेट घेतली व त्यांना हा जीआर दाखवला. यावेळी मनोज जरांगेंनी जीआर काळजीपूर्वक वाचला. समिती आता राज्यभरात काम करणार. त्यामुळे राज्यभरातील मराठा बांधवांना कुणबी दाखले मिळणार, याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया त्यावर मनोज जरांगेंनी दिली.

Advertisement

Advertisement