जालना- नऊ दिवसापासून आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांची पकृती बिघडली आहे.उपोषण सोडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .पाटील यांच्या किडनी आणि लिव्हरवर सूज आली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
जरांगे पाटलांच्या किडनी,लिव्हरवर सूज आली आहे. मागच्या वेळी त्यांनी उपोषण केलं होतं त्यापेक्षाही सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे. यावेळी त्यांना अधिक त्रास झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे पुढचे दोन आठवडे मनोज जरांगे पाटील यांना हॉस्पिटलमध्येच राहावं लागणार आहे.
बातमी शेअर करा