Advertisement

ग्रामपंचायतीमधील अनियमिततेची अधिकार्‍यांकडून पाठराखण

प्रजापत्र | Thursday, 24/12/2020
बातमी शेअर करा

तिंतरवणी ग्रामपंचायतीच्या चौकशीसाठी तारीख पे तारीख

बीड :  शिरूर तालुक्यातील तींतरवनी  ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली असली तरी या ग्रामपंचायतीच्या चौकशीसाठी जिल्हा परिषदेचे अधिकारी तारीख पे तारीख देत आहेत. भाजपच्या ताब्यातील ग्रामपंचायतीमधील  अनियमितेची राष्ट्रवादीच्या सत्तेत पाठराखण होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
शिरूर तालुक्यातील तींतरवनी ग्रामपंचायतीमध्ये मोठ्याप्रमाणावर गैरप्रकार झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केल्यानंतर जिल्हा परिषदेकडून या ग्रामपंचायतीची चौकशी सुरु करण्यात आली होती. फेब्रुवारी महिन्यात चौकशी करणार्‍या पथकाला ग्रामपंचायतीनेअभिलेखे देखील उपलब्ध करून दिली नाहीत. अगदी मासिक सभांचे इतिवृत्त आणि विविध योजनांचे कॅशबुक देखील चौकशी पथकाला देण्यात आले नाहीत. त्याबद्दल स्वतः मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी नोटीस बजावली होती. मात्र त्यानंतरही ग्रामपंचायतीच्या जबाबदार व्यक्तींवर कसलीही कारवाई झाली नाही. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात पुन्हा एक चौकशी समिती ग्रामपंचायत कार्यालयात गेली, मात्र यावेळीही समितीला अनेक अभिलेख दाखविलेच गेले नाहीत. याचा पंचनामा देखील करण्यात आला. खरेतर या प्रकरणात लगेच संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल होणे अपेक्षित होते. मात्र उपमुख्यकार्यकारी अधिकारी  गिरी यांनी या प्रकरणात गरमपंचायतीला आणखी एक संधी दिली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अनियमिततेच्या प्रकरणात कठोर भूमिका घेत असताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी राष्ट्रवादीच्या सत्ता काळात भाजपच्या ताब्यातील ग्रामपंचायतीमधील अनियमिततांची पाठराखण का करीत आहेत आणि चौकशीसाठी तारीख पे तारीख का करीत आहेत असा सवाल उपस्थित होत आहे.

 

 

 

Advertisement

Advertisement