Advertisement

तब्बल चौथ्या दिवशी ”नेटसेवा ” सुरु

प्रजापत्र | Friday, 03/11/2023
बातमी शेअर करा

बीड –  जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती .त्यामुळे सोशल मीडियाचे व्यसन लागलेले नेटकरी हतबल झाले होते. मात्र शुक्रवारी दुपारी बाराच्या दरम्यान इंटरनेट सुरू करण्यात आल्याने नेटकरी कामाला लागले आहेत.

 

                   मराठा आरक्षण मागणीच्या आंदोलनाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आंदोलक आक्रमक झाले होते. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून कांही अफवा पसरू नयेत म्हणून जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले होते.यामध्ये कांही अत्यावश्यक आस्थापना वगळता इंटरनेट पुर्णतः बंद केले होते. आणि याचा परिणाम म्हणून संपूर्ण मेसेजिंग यंत्रणा ठप्प झाली होती.
               परंतु मनोज जरांगे पाटील यांनी कांही कालावधीसाठी उपोषण थांबवल्याने परिस्थिती नियंत्रणात आल्याचे लक्षात आल्यानंतर इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्याने नेटकरी मोठ्या जोमाने कामाला लागले आहेत.

Advertisement

Advertisement