Advertisement

बस स्थानकातील तब्बल ५७ बसेसची तोडफोड

प्रजापत्र | Tuesday, 31/10/2023
बातमी शेअर करा

बीड-राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसवर काल केलेल्या दगडफेकीमुळे तब्बल ५७ बसेसचे नुकसान झाले आहे.बस स्थानकात उभ्या असलेल्या सर्व बसेस फोडण्यात आल्या.तसेच चौकशी कक्षावर ही दगडफेक करण्यात आली.त्यामुळे बस स्थानकात सर्वत्र काचाच काचा आढळून येत आहेत.

 

           बीड शहरात काल घडलेल्या प्रकारामुळे अतोनात नुकसान झाले आहे.राजकीय पदाधिकारी,हॉटेल,दुकान,कार्यालयापाठोपाठ बीड बस स्थानकातील सर्व उभ्या असलेल्या ५७ बसेसला आंदोलनकर्त्यांनी लक्ष केले.यामध्ये ५७ बसच्या काचा फोडण्यात आल्या.या घटनेत एसटी महामंडळाचे ७० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती विभाग नियंत्रक अजयकुमार मोरे यांनी दिली.दरम्यान इतिहासात पहिल्यांदाच बस स्थानकात जाऊन एवढ्या प्रमाणावर बस फोडण्यात आल्याची घटना घडली आहे.  

Advertisement

Advertisement