Advertisement

मतदार यादी दुरुस्त होईपर्यंत नायब तहसीलदारांना पगार नाही

प्रजापत्र | Thursday, 24/12/2020
बातमी शेअर करा

बीडच्या जिल्हाधिकार्‍यांचा फतवा

बीड :  मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर चूका असल्याचे सांगत मतदार यादीतील त्रुटी दूर होईपर्यंत निवडणुक विभागाच्या नायब तहसीलदारांचे वेतन स्थगित करण्याचा फतवा बीडचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी काढला आहे. जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या या निर्णयाबद्दल अधिकार्यांमधून तिव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
बीडचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचार्यांमधील दरी अधिकच वाढत आहे. निवडणुक आयोगाच्या निर्देशानूसार सध्या मतदार याद्यांच्या पुनरिक्षणाचा कार्यक्रम सुरु आहे. सध्या बीड जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाच्या याद्यामध्ये दुबार मतदार, छायाचित्र नसलेेले मतदार, 100 पेक्षा जास्त वय असलेे मतदार यांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्याचे निरीक्षण जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी नोंदविले आहे. या त्रुटी दुर होईपर्यंत प्रत्येक तहसील कार्यालयातील निवडणुक विभागाच्या नायब तहसीलदारांचे वेतन स्थगित करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी काढले आहेत. मात्र या आदेशांमुळे महसुल प्रशासनात खळबळ माजली असून इतर भत्ते रोखता येतात, कोणाचे वेतन रोखता येत नाही तरीही जिल्हाधिकार्यांनी असे आदेश कसे काढले अशी चर्चा महसुल अधिकारी करत आहेत.

 

 

Advertisement

Advertisement