बीड-जिल्हयातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी कडक पाऊले उचलली आहेत. हातभट्टीची दारू तयार करून त्याची विक्री करणाऱ्या अट्टल गुंडावर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करून आरोपीची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली.मागच्या ८-१० दिवसांत नंदकुमार ठाकूर यांच्यावतीने ८ जणांवर स्थानबद्दच्या कारवाया करण्यात आल्याची माहिती आहे.
परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात दशरथ भरत जाधव (वय-४८ रा. जिरेवाडी (इंदपवाडी) यावर हातभट्टीची दारू तयार करणे, जवळ बाळगणे, चोरटी विक्री करणे वगैरे स्वरुपाचे ६ गुन्हे दाखल आहेत.वारंवार आरोपी असे गुन्हे करत असल्याने त्याच्यावर एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक यांच्या मार्फतीने जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता.त्यानुसार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनखाली श्री.तावे पोलीस अंमलदार यांनी अटक करत आरोपीची हर्सूल कारागृहात रवानगी केली.