गुजरातमधील पालनपूर पाटियाजवळील नूतन रो हाऊससमोर एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सिद्धेश्वर अपार्टमेंटमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सध्या पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास करत आहेत. वडिलांनी कुटुंबियांना औषध देऊन गळफास घेतला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या कुटुंबातील सात सदस्यांमध्ये पती-पत्नी, आई-वडील, दोन मुले आणि एक मुलगी यांचा समावेश आहे. या घटनेचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. पोलिसांनी प्रथम मृतदेह रुग्णालयात हलवण्याची कारवाई केली आहे. यासोबतच आजूबाजूचे लोक आणि कुटुंबीयांचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र, आर्थिक विवंचनेमुळे कुटुंबाने आत्महत्या केली असावी, असा अंदाज आता वर्तवला जात आहे.
बातमी शेअर करा