बीड - शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शिवदरा परिसरात एका १६ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
शहरातील पालवण रोड येथील राम परमेश्वर इंगळे (वय-१६) याचा मृतदेह आज सकाळी शिवदरा परिसरामध्ये आढळुन आला. तो पोहण्यासाठी गेला होता असे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी एपीआय रणखांब, पीएसआय आवारे, पोलिस हवालदार गायकवाडी यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला.
बातमी शेअर करा