बीड - धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अमलबजावणी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आज (दि.२३) रोजी सकल धनगर समाज बीडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता.
हा मोर्चा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुभाष रोड मार्गे साठे चौक व बीड सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून नगर रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.
भारतीय संविधानानूसार कलम ३४२ मध्ये अनुसूचित जमातीला आरक्षण दिलेले आहे. या कलमा परिशिष्ट ३६ वर धनगर जमातीला आरक्षण आहे. परंतू आजपर्यंत महाराष्ट्रातील धनगर जमातीला न्याय हक्कापासून वंचित ठेवण्याचे काम महाराष्ट्र शासनाने केले आहे. दरम्यान शासनाने धनगर समाजाच्या मागणीची दखल घ्यावी यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी समाजातील युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.