केज - तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील सैन्य दलात कार्यरत असलेल्या सैनिकाने आज (दि.२०) राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत जीवन संपविल्याची घटना उघडकीस आली आहे.
अरुण ठोंबरे (अंदाजे वय-३२) असे आत्महत्या केलेल्या सैनिकाचे नाव आहे. आज सायं ७च्या दरम्यान त्याने त्याच्या राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत जीवन संपविले आहे. मागील ३ दिवसा पूर्वीच तो गावाकडे आला होता. त्याच्या आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप अस्पष्टच असून मृतदेह शवच्छेदनासाठी हलविण्यात आला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
बातमी शेअर करा