Advertisement

माजलगावात मराठा आरक्षण प्रश्नावर वारकऱ्यांचा दिंडी मोर्चा

प्रजापत्र | Tuesday, 17/10/2023
बातमी शेअर करा

माजलगाव - करीतो वंदन जरांगे पाटलांना... असे अभंग व घोषणा देत टाळ मृदंगांच्या गजरात शहरातुन वारकरी सांप्रदायाच्या वतीने तहसिल कार्यालयावर दिंडी मोर्चा आज (दि.१७) रोजी काढण्यात आला.

मराठा आरक्षणप्रश्री मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ येथील सकल मराठा वारकरी सांप्रदयाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये आरक्षण द्या.. तुम्ही आरक्षण द्या.. शिंदे सरकार आरक्षण द्या, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा मराठा आरक्षण संदर्भात विवीध घोषणा व भजन, गायन, भारूड सादर करत हा दिंडी मोर्चा शहरातील हनुमान चौक मार्गे संभाजी महाराज चौक व तहसिल कार्यालयावर धडकला. मागण्यांचे निवेदन तहसिल प्रशासनास देण्यात आले. मोर्चामध्ये सर्जेराव महाराज काशिद, दिगंबर महाराज घाडगे, महारूद्र महाराज पवार, गोपाळ महाराज नरके, कालिदास महाराज नाईकनवरे, विजय महाराज बादाडे, नवनाथ महाराज शेंडगे, सुभाष महाराज होंगे यांचेसह वारकरी सहभागी झाले होते.

Advertisement

Advertisement