जालना: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे या मागणीसाठी आज जिल्ह्यातील आंतरवली (सराटी) येथे मनोज जरांगे यांची सभा होत आहे. सभेला आणखी तीन तासांचा वेळ असला तरी आताच सभेसिठीचे मैदान फुल झाले आहे. लाखोंच्या संख्येने मराठा समाज आंतरवली मध्ये जमला असून आज जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
आंतरवलीत राज्याच्या सर्व भागांमधून मराठा समाज, त्यातही गरिब मराठा पोहचत आहे. शुक्रवारी रात्रीपासूनच मराठा समाजबांधव आंतरवलीत दाखल असून अनेकांनी उघड्या आभाळाखाली रात्र काढली आहे. सकाळपासून आंतरवलीकडे येणाऱ्या सर्व मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळत आहेत. आता आजच्या सभेत जरांगे नेमकं काय बोलतात याकडे राज्याचे लक्ष आहे.
बातमी शेअर करा