बीड - गेवराई तालुक्यातील माळस-पिंपळगाव रस्त्यावर काल रात्री ८ च्या दरम्यान बिबट्या दिसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे येथील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या बिबट्याचा शोध वन अधिकारी घेत आहेत.
माळस-पिंपळगाव रस्त्यावर कैलास डाके, कृष्णा डाके, अतिश हजारे हे तिघेही आपल्या स्कॉर्पिओ गाडीने प्रवास करत असतांना काल रात्री ८ च्या दरम्यान त्यांना नांगरटीच्या पुलाजवळ कापसाच्या शेतात गट नं-३३ मध्ये बिबट्या दिसला आहे. अशी माहिती येथील वन परिमंडळ अधिकारी सुनील टाकणकर, यांनी 'प्रजापत्र' ला दिली. यावेळी त्यांनी नागरिकांना येथून प्रवास करत असतांना सावध रहा असे आवाहन केले आहे. या बिबट्याचा शोध सुरु आहे.
बातमी शेअर करा