मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. नवाब मलिक यांच्या जामीनाला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मनी लाँडरिंग अर्थात पैशाच्या अफरातफर प्रकरणात नवाब मलिक तब्बल दीड वर्ष जेलमध्ये होते. मात्र वैद्यकीय उपचारासाठी त्यांना ११ ऑगस्ट रोजी जामीन मंजूर झाला होता. या जामीनाला आता सुप्रीम कोर्टाने मुदतवाढ दिली आहे. तब्बल तीन महिन्यांची मुदतवाढी नवाब मलिकांच्या जामीनाला देण्यात आली आहे.
बातमी शेअर करा