Advertisement

धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

प्रजापत्र | Wednesday, 11/10/2023
बातमी शेअर करा

माजलगाव - धनगर समाज अनूसूचित जमाती एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग कल्याण विशाखपट्टणम परभणी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन आज (दि.११) रोजी करण्यात आले. दरम्यान दुचाकी रॅलीने शहवासीयांचे लक्ष वेधले. 

 

राज्यातील धनगर समाजाला अनूसुचित जमाती एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी धनगर समाज हा मागील पन्नास वर्षांपासून लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहे परंतु शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे आरक्षणाची अमलबजावणी करावी या मागणीसाठी माजलगाव येथील वसंतराव नाईक चौक परभणी चौफाळा येथे राष्ट्रीय महामार्ग कल्याण-विशाखापट्टणमवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

 

Advertisement

Advertisement