Advertisement

विद्युत मोटारचा शॉक लागून महिलेचा मृत्यु

प्रजापत्र | Wednesday, 11/10/2023
बातमी शेअर करा

पाटोदा - पाणी भरत असतांना विद्युत मोटारचा शॉक लागून एका महिलेचा मृत्यु झाल्याची घटना उघडकीस आली आहे. 

 

साधना नवनाथ आघे (वय-४०) रा.उखंडा असे शॉक लागून मृत्यु झालेल्या महिलेचे नाव आहे. सदरील महिला पाणी भरत असतांना अचानक त्यांना विद्युत मोटारचा शॉक बसला. त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल केल असता डॉक्टरांनी तपासुन मृत घोषीत केले.

Advertisement

Advertisement