Advertisement

आमदार अपात्रतेच्या सुनावणीच्या तारखेत बदल

प्रजापत्र | Wednesday, 11/10/2023
बातमी शेअर करा

मुंबई - शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. अपात्रतेच्या सुनावणीच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. गुरुवारी १३ ऑक्टोबर रोजी होणारी सुनावणी आता बुधवारी १२ ऑक्टोबरलाच होणार आहे. त्यामुळे उद्याच्या सुनावणीत काय होणार याकडे साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. 

 

सुनावणी लवकर घेण्यामागचे कारण काय?

सुनावणीच्या वेळापत्रकातील बदल ठाकरे गटाच्या याचिकेमुळे करण्यात आलेला नाही. जी २० देशांच्या सभागृह अध्यक्षांची बैठक दिल्लीत होणार असल्याने सुनावणीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. १३ ऑक्टोबरला होणारी सुनावणी आता एक दिवस आधीच होणार आहे.

Advertisement

Advertisement