पंढरपूर - राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या उपस्थितीत पंढरपुरात राज्यस्तरीय कृषी मेळावा आयोजीत केला होता. या कार्यक्रमात खते बी बियाणे दुकानदारांनी तुफान गोंधळ केलाय. बोगस बी बियाणे संदर्भात दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्याच्या कायद्या विरोधात दुकानदार आक्रमक झाले आहेत.
आज पंढरपूरमध्ये राज्यस्तरीय कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला राज्यभरातून 25 हजारापेक्षा जास्त खते बियाणे दुकानदार पंढरपूरमध्ये आले आहेत. मात्र, या कार्यक्रमात दुकानरांनी गोंधळ केल्याचे पाहायला मिळाले.
बातमी शेअर करा