बीड - मागील ८ दिवसापूर्वी राष्ट्रवादी भवन समोर एका हॉटेल मॅनेजरची रस्त्यावरील खड्डा चुकवतांना गाडी स्लिप झाली होती. तो या अपघातात गंभीर जखमी झाला होता. तब्ब्ल ८ दिवस मृत्युशी झुंज देत अखेर आज सकाळी त्याची प्राणज्योत मालावली.
अधिक माहिती अशी कि, शहरातील एका हॉटेलवर मॅनेजर म्हणून काम करत असलेला महेश पाचंग्रे (वय-३०) याचा राष्ट्रवादी भवन समोरील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यामुळे अपघात झाला. या अपघातात जखमी झाल्यानंतर त्याला एका खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्याची झुंज अपयशी ठरली. आज त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या घटनेने शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
बातमी शेअर करा