Advertisement

"राष्ट्रवादी पक्ष आमचाच, बहुसंख्य लोकं आमच्यासोबत"

प्रजापत्र | Friday, 06/10/2023
बातमी शेअर करा

पुणे - राष्ट्रवादी कुणाची? याबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीकडं सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे. त्यावरच शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी पक्ष आमचाच आहे आणि जास्तीत जास्त लोक पवार साहेबांसोबत आहेत, असा दावा केला आहे. पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारीदेखील आमच्यासोबत आहेत शिवाय दिल्लीत 24 राज्याचे प्रदेशाध्यक्ष आमच्यासोबत होते, असं त्यांनी म्हटलं आहे. 

 

 

शिवसेनेच्या फुटीनंतर सर्वोच्च न्यायालयात प्रश्न मांडला गेला त्यावेळी, आमदार गेले म्हणजे पक्ष जातो असं नाही, तर पक्ष हा कायम पक्ष राहतो, असं सर्वौच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती चंद्रचुड यांनी म्हटलं होतं. आमचे आमदार पक्षापासून लांब गेले किंवा त्यांनी वेगळी भूमिका घेतली तर हा त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे पक्ष जाण्याची आवश्यकता नाही, असं म्हणत जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी पक्ष आपलाच आहे, असा दावा केला आहे.

Advertisement

Advertisement