Advertisement

आता जुगार अड्डयावर गणेश मुंडेंचा छापा

प्रजापत्र | Thursday, 05/10/2023
बातमी शेअर करा

 

बीड-गोदापात्रात  छापा मारून दोन कोटींचा मुद्देमाल पोलीस अधिक्षक पथक प्रमुख तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांनी काल ताब्यात घेतल्यानंतर आज शिरूर कासार हद्दीतील खालापुरी येथील एका जुगार अड्डयावर धाड मारून सव्वाचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावेळी पोलिसांनी बारा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

   शिरूर कासार तालुक्यातील खालापुरी येथील सानप वस्तीवर मागील काही महिन्यापासून पत्त्याचा क्लब सुरु असल्याची माहिती सपोनि गणेश मुंडे यांना मिळाली होती. यानंतर गुरुवारी (दि.५) त्यांनी व पथकातील सहकारी पोलिसांनी या वस्तीवर छापा मारून १२ जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत नगदी रक्कम, दुचाकी असा एकूण ४ लाख २६ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. दरम्यान गणेश मुंडे यांच्या अवैध धंद्याविरोधातील  होणाऱ्या कारवाया आता जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरू लागल्या आहेत.

 

 

Advertisement

Advertisement