मुंबई - बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला ईडीने समन्स बजावला आहे. तपास यंत्रणेने अभिनेत्याला 6 ऑक्टोबरला चौकशीसाठी बोलावले आहे. प्रकरण ऑनलाइन गेमिंगशी संबंधित आहे. ऑनलाइन गेमिंग अॅप प्रकरणातील आरोपी सौरभ चंद्राकरच्या लग्नाला रणवीर महादेव सहभागी झाला होता. सौरभवर हवालाद्वारे कलाकारांना पैसे दिल्याचा आरोप आहे.
रणबीर कपूर या अॅपचे प्रमोशन करत होता. त्याला मोठी रक्कम रोख स्वरूपात मिळाल्याचा ईडीचा दावा आहे. ईडी ऑनलाइन गेमच्या जाहिरातींद्वारे निधीची देखील चौकशी करेल. रणबीर कपूर ईडीसमोर हजर राहतो की त्याच्या वकिलामार्फत समन्सला उत्तर देणार हे पाहणे बाकी आहे.
बातमी शेअर करा