Advertisement

दहा हजारांची लाच स्वीकारताना विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

प्रजापत्र | Wednesday, 04/10/2023
बातमी शेअर करा

पाटोदा - पाटोदा पंचायत समितीतील विस्तार अधिकारी यांना आज दहा हजारांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले. ही कारवाई धाराशिव एसीबीच्या पथकाने केली. 

 

 

अधिक माहिती अशी कि, जयश मुकूंद भुतपल्ले (वय-36) विस्तार अधिकारी कृषि, वर्ग-3, पंचायत समिती पाटोदा यांनी संबंधित तक्रारदाराकडून तुमच्या कृषि सेवा केंद्र दुकानातील औषधाचे सॅम्पल न घेण्यासाठी व वर्षभराच्या सिझनमध्ये कारवाई न करण्यासाठी व सहकार्य करण्यासाठी संबंधित तक्रारदाराला दहा हजाराची मागणी केली होती. यामध्ये दहा हजाराची रक्कम घेताना आज संबंधित विस्तार अधिकाऱ्याला एसीबीने रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, पोलीस उपअधीक्षक धाराशीव सिद्धराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पो.नि.नानासाहेब कदम, धाराशीव, सापळा पथक पोलीस अंमलदार विशाल डोके, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर, अविनाश आचार्य, दत्तात्रय करडे यांनी केली.

 

 

Advertisement

Advertisement