बीड - बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी अखेर धनंजय मुंडे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. दोन महिन्यापासून या नियुक्तीची सर्वांना प्रतिक्षा होती.
राज्यातील पालकमंत्र्यांच्या नावांमध्ये बदल करण्यात आला असून यात अजित पवारांकडे पुणे तर धनंजय मुंडेंना बीडचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे.
सुधारित ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे:
पुणे- अजित पवार
अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
भंडारा- विजयकुमार गावित
बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर- हसन मुश्रीफ
गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
बीड- धनंजय मुंडे
परभणी- संजय बनसोडे
नंदूरबार- अनिल भा. पाटील
वर्धा - सुधीर मुनगंटीवार
बातमी शेअर करा