आज गांधी जयंती निमित्त I.N.D.I.A. आघाडीची 'मी पण गांधी' पदयात्रा मुंबईत इंडिया आघाडीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी इंडिया आघाडीच्या रॅलीसाठी जमलेले कार्यकर्त आणि पोलिसांची बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांकडून कांग्रेस कार्यालय परिसरात जमलेल्या कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर कार्यकर्ते काहीसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच, जमावबंदीचे आदेश लागू असल्याचं सांगत पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकडही करण्यात आली.
दक्षिण मुंबईतील काँग्रेस कार्यालयाच्या इंडिया आघाडीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. मोर्चा सुरू झाल्यानंतर कार्यकर्ते मात्र काहीसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, इंडिया आघाडीच्या पदयात्रेसाठी या मोर्चासाठी वर्षा गायकवाड, सचिन अहिर उपस्थित होते.