बीड - भरधाव ट्रकने स्कुटीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात स्कुटीवरील तरूणीचा जागीच मृत्यू झाला असून वडील गंभीर जखमी झाले आहेत. सदरील अपघात आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास वडवणी येथील आंधळे यांच्या पेट्रोलपंपासमोर घडला.
वडवणी तालुक्यातील चिंचोली येथील शिवनारायण गोंडे हे मुलगी स्वाती शिवनारायण गोंडे (वय-२१) हिच्यासह वडवणीहून चिंचोलीला स्कुटीवरून जात होते. वडवणीतील आंधळे यांच्या पेट्रोल पंपासमोर (ट्रक क्र.एम.एच १६ ए.वाय ८५६७) ने स्कुटीला पाठीमागुन जोराची धडक दिली. या अपघातात स्वाती गोंडे हिचा जागीच मृत्यू झाला तर वडील शिवनारायण गोंडे हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर बीड येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
बातमी शेअर करा