Advertisement

कोरोनाची लस घेतल्यानंतर नर्सची प्रकृती बिघडली

प्रजापत्र | Sunday, 20/12/2020
बातमी शेअर करा

अमेरिका : कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. अनेक कंपन्यांनी लसीकरणाच्या आपत्कालीन वापराची परवानगी संबंधित देशाकडून मिळवली आहे. मात्र काही देशांमध्ये लस घेतल्यानंतर काही रुग्णांची प्रकृती बिघडल्याचे समोर येत आहे. अमेरिकेमध्ये लसीकरण झाल्यानंतर खूप लोकांना त्रास जाणवत आहे. अशातच एक नवीन घटना समोर आली आहे. अमेरिकेच्या एका नर्सला लसीकरणाच्या  नंतर चक्क आल्याचे समोर आले आहे.  
                   अमेरिकेतील टेनेसी राज्यातील चित्तानुगा रुग्णालयात एका नर्सवर लसीचा दुष्परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे. रुग्णालयात नर्स असलेल्या टिफनी डोव्हर यांना फायझर बायोएनटेकची लसीचा पहिला डोस देण्यात आला. डोस घेतल्यानंतर टिफनी या माध्यमांशी बोलत होत्या.माध्यमांशी बोलत असताना टिफनी यांना चक्कर आल्यासारखं झालं. त्यानंतर माफ करा, मला चक्कर आल्यासारखं होतंय असं त्या म्हणाल्या. नंतर चालू लागल्या. याचवेळी अचानक तोल जाऊन त्या कोसळल्या. मात्र, आजूबाजूला असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडलं. तोपर्यंत त्या बेशुद्ध झाल्या होत्या.

 

Advertisement

Advertisement