Advertisement

अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशीही सुट्टी जाहीर

प्रजापत्र | Wednesday, 27/09/2023
बातमी शेअर करा

मुंबई - अनंत चतुर्दशी अर्थात गणेश विसर्जन उद्या गुरुवारी पार पडणार आहे. याच दिवस ईद-ए-मिलाद हा सण देखील आहे. त्यामुळं राज्यभरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांवर येणारा प्रचंड ताण लक्षात घेता शुक्रवारी २९ सप्टेंबर रोजी देखील राज्यात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळं गुरुवार आणि शुक्रवार अशा दोन दिवस सर्व शासकीय कार्यालयं बंद राहणार आहेत. 

मुख्यमंत्री कार्यालयानं याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार, अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन आणि ईद-ए- मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवारी, २८ सप्टेंबर होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचं योग्य व्यवस्थापन करणं पोलीस प्रशासनाला शक्य व्हावं म्हणून शुक्रवारी २९ तारखेला शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे.

 

 

शिष्टमंडळाची विनंती मान्य
ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळानं यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विनंती केली होती. राज्यात शांततेचं वातावरण असावं आणि गर्दी तसेच मिरवणुकांचं नियोजन करता येणं पोलिसांना शक्य व्हावं म्हणून २९ तारखेला सुट्टी देण्याची विनंती त्यांनी केली होती. या शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळे, आमदार अबू आझमी, आमदार रईस खान, नसीम खान आदींचा समावेश होता.

Advertisement

Advertisement