Advertisement

मनोज जरांगे राज्यातील उपोषण स्थळी देणार भेट

प्रजापत्र | Saturday, 23/09/2023
बातमी शेअर करा

मराठा समाजाला आरक्षण मिळावे करीता शासनाला ३० दिवसाचा वेळ दिला आहे. हि मुदत १४ आक्टोंबर रोजी संपत आहे या दिवशी शासनाच्या आदेशाची वाट पाहाणे व पुढील नियोजन करणे यासाठी राजस्तरीय सभेचे नियोजन करण्यात येत असल्याचे अंतरवाली सराटी येथे उपोषण स्थळी मनोज जरांगे यांनी शनिवार (दि.२३) रोजी सांगीतले. या ठिकाणी गोदाकाठावरील १४२ गावातील मराठा समाज बांधवांचा मेळावा जरांगे यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला.या नियोजन मेळाव्याला मोठ्या प्रमाणात नागरीकांची उपस्थिती होती.

या वेळी बोलतांना जरांगे यांनी सांगितले कि.मराठा आरक्षण करीता अंतरवाली सराटी येथे आमरण व साखळी उपोषण होत आहे. शासनाने तिस दिवसाची मुदत मागतली ती मुदत दिली व आमरण उपोषण थांबवले आता साखळी उपोषण करण्यात येत आहे.

 

शासनाला जी मुदत दिली ती १४ आक्टोंबर रोजी संपत आहे . अंतरवाली सराटी परीसरात या भव्य दिव्य सभेचे नियोजन करण्यात येणार आहे या करीता सभेच्या जागेची पाहणी करण्यात येत आहे.या ठिकाणी याच दिवशी राज्यभरातील मराठा बांधवांना बोलावुन नियोजन सभा घेण्यात येणार आहे. या सभेत तिस दिवसा नंतर शासनाने काय निर्णय घेतले, कोणते जी.आर.आले, शासनाची पुढील दिशा काय असणार व पुढे काय निर्णय घ्यायचा आहे हि संपुर्ण माहिती नागरीकांना देण्यात येणार आहे. ३० दिवसा नंतर शासनाकडून मध्यस्थी करण्यासाठी जे कोणी येतील त्यांना बंदी घालण्यात येणार आहे.

 

कोणालाही (लोकप्रतिनिधी/शासकीय अधिकारी) यांना अंतरवाली येथे सभास्थानी येता येणार नाही त्यांना बंदी घातली जाईल असे जरांगे पाटील यांनी सांगितले. आरक्षण देण्यासाठी शासनाला ३० दिवसाचा वेळ व १० दिवस शिल्लक दिले आहे त्यामुळे त्यांनी लवकर निर्णय घेऊन आरक्षण द्यावे , राज्यात सध्या ज्या ज्या ठिकाणी उपोषण अथवा साखळी उपोषण चालू आहे त्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी मनोज जरांगे व सहकारी मंडळ आता भेट देणार आहे त्या गावाची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे व त्यांची भेट घेऊन चर्चा करण्यात येणार असल्याचे मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे सांगीतले.शनिवारी अंतरवाली सराटी येथे साखळी उपोषण स्थळी रेणापुरी व नालेवाडी या गावातील नागरिकांनी जागर केला.

Advertisement

Advertisement