धाराशिव : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार बळाचा गैरवापर झाल्या प्रकरणी दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करणे व मराठा आंदोलकांवर झालेले गुन्हे माघारी घेणेबाबतचे निवेदन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवार 4 सप्टेंबर रोजी मा.जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, मराठा आरक्षण चा लढा रस्त्यावर आणि न्यायालयात ही तितक्याच ताकदीने लढण्याची मराठा समाजाची भूमिका आहे. राज्यातील मराठा आंदोलनाने लोकशाही व्यवस्थेत शांततामय आंदोलनाचा आदर्श जगासमोर निर्माण केला आहे. हा आदर्श आणि गौरवशाली परंपरा कायम ठेवून कायदा सुव्यवस्था कायम राखत लोकशाही मार्गानेच हे आंदोलन चालू होते . अशा मध्ये पोलीस प्रशासनाने जालना जिल्ह्यातील अंबड या ठिकाणी अमानुष असा हल्ला केला यात लहान बालके, महिला, वृद्ध व्यक्ती, तरुण गंभीर रित्या जखमी झाले आहेत. मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे किंवा राज्यात कुठेही होणाऱ्या शांततामुळे आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उस्मानाबाद धाराशिव व राज्यातील नागरिकांचा पाठिंबा आहे. घटनेतील दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात यावी व मराठा समाजातील तरुणांवर जे गुन्हे दाखल झाले ते मागे घेण्यात यावे अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी खालील पठाण प्रदेश सचिव अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र राज्य,अतुल जगताप जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग,मच्छिंद्र क्षीरसागर माजी सैनिक सेल जिल्हाध्यक्ष, सतीश घोडेराव सेवादल सेल जिल्हाध्यक्ष,प्रशांत फंड तालुकाध्यक्ष उस्मानाबाद, असद खान पठाण जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग, डि.के कांबळे शहराध्यक्ष सामाजिक न्याय विभाग, राजकुमार पवार शहर उपाध्यक्ष, बालाजी शिंदे उपसरपंच केशेगाव,प्रतीक चंद्रकांत माने तालुकाध्यक्ष विद्यार्थी, सागर गाढवे तालुका सचिव विद्यार्थी, राजाभाऊ जानराव सहसचिव सामाजिक न्याय विभाग, भाई फुलचंद गायकवाड, सुरेश राठोड आंबेजोगाई जि.प. गट प्रमुख तसेच आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते.
प्रजापत्र | Monday, 04/09/2023
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा