Advertisement

अज्ञात वाहनाच्या धडकेत शिक्षक ठार

प्रजापत्र | Monday, 04/09/2023
बातमी शेअर करा

माजलगाव - मोटारसायकल वरून माजलगावकडे येणाऱ्या शिक्षकाला अज्ञात वाहनाची धडक बसली.या अपघातात शिक्षकाचा जागीच मृत्यु झाला.ही घटना रविवारी रात्री अकरा वाजता माजलगाव तालुक्यातील जायकोवाडी फाट्यावर घडली.

 

वचिष्ठ महादेव जगताप (वय-38) राहणार शृंगारवाडी,हे माजलगाव येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात शिक्षक होते. रविवारी रात्री 11 वाजता ते आपल्या गावावरून माजलगावकडे मोटरसायकल वरून येत होते. यावेळी राष्ट्रीय महामार्गावरून ते जायकोवाडी फाट्याजवळ आले. यावेळी अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली.या झालेल्या अपघातात वचिष्ठ जगताप यांचा जागीच मृत्यु झाला.

Advertisement

Advertisement