एकदिवसीय विश्वचषकापूर्वी पाचवेळचा चॅम्पियन संघ ऑस्ट्रेलियाच्या दुखापतींच्या वाढत्या यादीमुळे चिंता वाढली आहे. कर्णधार पॅट कमिन्ससह चार महत्त्वाच्या खेळाडूंना दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून वगळण्यात आले आहे. मात्र, भारत दौऱ्यापूर्वी हे चार खेळाडू तंदुरुस्त होतील, अशी अपेक्षा आहे. पॅट कमिन्स, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क यांच्याशिवाय दक्षिण आफ्रिका दौर्यापासून अनफिट असल्याने त्यांना बाहेर ठेवण्यात आले होते. आता या यादीत ग्लेन मॅक्सवेलचे नाव जोडले गेले आहे.
अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल प्रशिक्षणादरम्यान घोट्याला दुखापत झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेतील टी-२० मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी मॅथ्यू वेडचा संघात समावेश करण्यात आला. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या सराव सत्रादरम्यान ३४ वर्षीय खेळाडूच्या डाव्या पायात फ्रॅक्चर झाल्याने त्याच्या डाव्या पायात आधीच प्लेट आहे. परिणामी, ऑस्ट्रेलियन निवडकर्त्यांनी जोखीम न घेण्याचा निर्णय घेतला आणि मॅक्सवेल विश्वचषकापूर्वी भारतात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी उपलब्ध होईल असा विश्वास आहे.