मुंबई - सुप्रिया सुळे, अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत, त्यात काही वादच नाही. फूट पडणे याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी होते, जर पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला तर, आज तशी स्थिती येथे नाही. असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा संभ्रमात टाकणारे वक्तव्य केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांबाबत असेच वक्तव्य केले होते. यावर शरद पवार यांनाही प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना शरद पवारांनी वरील मत व्यक्त केले आहे. काही लोकांनी पक्ष सोडला, वेगळी भूमिका घेतली लोकशाहीमध्ये तो त्यांचा अधिकार आहे. वेगळा निर्णय घेतला म्हणून फूट म्हणण्याचे काही कारण नाही, हा त्यांचा निर्णय आहे, असे देखील शरद पवार म्हणाले.
बातमी शेअर करा