बीड-महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सदस्य तथा प्रेस फोटोग्राफर महेश जोशी यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी (दि.१८) सकाळी पहाटे निधन झाले.मृत्युसमयी ते ४१ वर्षांचे होते.औरंगाबाद येथे उपचारा सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
बीड शहरात २० वर्षांपासून महेश जोशी हे प्रेस फोटोग्राफर म्हणून कार्यरत होते.अत्यंत मनमिळाऊ स्वभाव असल्याने ते सर्वपरिचित होते.त्यांची फोटोग्राफी कायम चर्चेत असायची.त्यांनी आपल्या फोटोग्राफीसारख्या क्षेत्रातून मोठा नाव लौकिक मिळविला होता.त्यांच्या अकाली निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत असून आज सकाळी ९.३० च्या सुमारास मोंढा भागातील अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी,एक मुलगी असा परिवार आहे.दरम्यान जोशी परिवाराच्या दुःखात दैनिक प्रजापत्र परिवार सहभागी आहे.
बातमी शेअर करा