उमापुर, (प्रतिनिधी):- मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोघांना अज्ञात पिकअपने जोरदार धडक दिली.या धडकेत उमापूर येथील एक आडत व्यापारी जागीच ठार झाला आहे.तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे.सदर घटना गेवराई- शेवगाव या महामार्गावरील उमापूर गाव परिसरात आज रविवार रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे.
गोपाल राऊत (वय ५२) अस अपघातात मृत्यू झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.गोपाळ राऊत व त्यांच्या सोबत मनोज पाटणी हे दोघे नेहमीप्रमाणे आज पहाटे मॉर्निग वॉक करायला गेले होते.या दरम्यान भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने त्यांना जोराची धडक देत उडविले. यामुळे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात गोपाळ राऊत यांचा जागीच मृत्यू झाला.तर त्यांचे सहकारी मनोज पाटनी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ संभाजीनगरला हलवले आहे.याप्रकरणी बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यात,अज्ञात वाहनधारका विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.घटनास्थळी पो काॅ.पवार व सुर्यवंशी यांनी भेट दिली.जिवन जगण्यासाठी मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यापा-यावर काळाने घाला घातल्याने उमापूर परिसरात व्यापारी व ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.दरम्यान घटनास्थळवरुन वाहनधारकानी धुम ठोकली असून चकलांबा पोलीस त्याचा शोध घेत आहे.