महाविकास आघाडीच्या युतीवर बोलताना, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी शरद पवार हे ‘इंडिया’ आघाडीसोबतच असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रातील कोअर कमिटीची आज बैठक झाली. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना आमदार नाना पटोले म्हणाले. यापूर्वी अनेकवेळा शरद पवार यांनी आपण विरोधी पक्षाच्या आघाडीसोबत कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शरद पवार हे पॉवरफूल नेता आहेत. ते त्यांच्या पक्षासंदर्भातील काहीही निर्णय घेऊ शकतात. पण आम्हाला विश्वास आहे की, ते इंडिया आघाडी सोबत राहतील, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये ३ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात सुरू होणारी पदयात्रा, लोकसभा निवडणूक-२०२४, तसेच इंडिया आघाडीच्या आगामी बैठकी संदर्भात चर्चा झाल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.