बीड - मागील दोन दिवस पूर्वी मनसे बीड शहर अध्यक्ष करण लोंढे यांच्या नेतृत्वातखाली खड्ड्यात झाडे लावून आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांनी जालना रोड ते मोंढा अमरधाम पर्यंत रस्त्याचे काम दोन दिवसात सुरु करा नाही तर नगर परिषद फोडू असा इशारा दिला होता. त्यानुसार आज बीड नगर परिषदमध्ये कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचे पाहिला मिळाले.
शहरातील जालना रोड ते अमरधाम मोंढा यादरम्यानच्या रस्त्यामध्ये शेकडो खड्डे आहेत. यामुळे नागरिकांना प्रवास करतांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे मागील दोन दिवसापूर्वी मनसेचे बीड शहर अध्यक्ष करण लोंढे यांच्या नेतृत्वातखाली खड्ड्यात झाड लावून आंदोलन केले होते. यावेळी नगर परिषदला दोन दिवसात या रस्त्याचे काम सुरु करा नाही झाले तर नगर परिषद फोडू असा इशाराही दिला होता. त्यानुसार आज (दि.११) रोजी सकाळी ११:३० च्या दरम्यान मनसे बीड शहर अध्यक्ष करण लोंढे व कार्यकर्त्यांनी नागरपरिषदमध्ये तोडफोड केल्याचे पाहिला मिळाले.