काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना खासदारकी बहाल करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाकडून याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे संसदेमध्ये पुन्हा गांधी वादळ धडकणार आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे. आजपासून राहुल गांधी हे लोकसभेमध्ये उपस्थित राहणार आहेत.
बातमी शेअर करा