गुजरात - प्रदीपसिंह वाघेला यांनी नुकताच गुजरात भाजपच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत असलेल्या भाजपला हा मोठा झटका बसला आहे.
प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्यानंतर प्रदीपसिंह वाघेला हे गुजरात भाजपमधील दुसरे शक्तिशाली नेते आहेत. यापूर्वी राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा होती. यामध्ये प्रदीपसिंह वाघेला हे नवीन प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत प्रमुख उमेदवार म्हणून समोर आले.
मात्र, आता त्यांच्या जाण्यानं अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. राजीनाम्यावर प्रदीप सिंह वाघेला यांनी काही दिवसांत सर्व काही ठीक होईल, असं म्हटलंय. वाघेला यांची 10 ऑगस्ट 2016 रोजी गुजरात भाजपचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
बातमी शेअर करा