Advertisement

जयपुर - मुंबई एक्सप्रेस मध्ये गोळ्या घालून हत्या करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

प्रजापत्र | Friday, 04/08/2023
बातमी शेअर करा

औसा (प्रतिनिधी) जयपुर - मुंबई एक्सप्रेस रेल्वे मध्ये गोळ्या घालून हत्या करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन योग्य ती कठोर कार्यवाही करुन त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी .अशी मागणी एम आय एम च्या वतीने औसा तहसीलदार मार्फत राष्ट्रपती यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

 

त्याचे सविस्तर वृत्त असे दिनांक 31 जूलै 2023 रोजी पहाटेच्या सुमारास एका रेल्वे पोलिसांने निष्पाप लोकांवर सांप्रदायिक दृष्टीकोनातून एक विशिष्ट समाजाचे 3 तरुणांना शासकीय शस्त्राने गोळ्या घालून हत्या केली आहे.हत्या झालेले व्यक्ती हे मुस्लिम समाजातील अत्यंत गरीब कुटुंबातील व्यक्ती होते.अश्या दृष्कृत करणा-या व्यक्तीस आंतकवादी घोषित करुन जलदगतीने न्यायालयात खटला चालवून त्यास फाशीची शिक्षा देण्यात यावी.तसेच मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना शासकीय सेवेत प्राधान्य देण्यात यावे व त्यांच्या मुलाबाळांचे शिक्षणाचे खर्च शासनामार्फत करण्यात यावे व मरण पावलेल्या प्रत्येक व्यक्तींना 50 लाख रुपये मदत देण्यात यावी.

भारतात राहायचे असेल तर मोदी शहा यांना मतदान करा, अन्यथा सर्वांचे असेच हाल होतील.असे विधान सदरील व्यक्तींकडून करण्यात येत होते.अशा देशविघातक कृतींना रोखण्यासाठी कायदा बनविण्याची आवश्यकता आहे.तसेच देशात प्रत्येक ठिकाणी मुस्लिम समाजावर असे हल्ले व अन्याय करण्यात येत आहे.तरी सन्माननीय राष्ट्रपती यांनी हत्या करणाऱ्या व्यक्तीवर योग्य ती कठोर कार्यवाही करुन त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी.अशी मागणी एम आय एम पक्षाच्या वतीने औसा तहसीलदार मार्फत राष्ट्रपती यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.यावेळी एम आय एम चे औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार,अजहर कुरेशी, हारुणखा पठाण, शेख नय्युम,मौला शेख, सय्यद जलील, शहबाज सय्यद, जाकेर शेख,सैफ बागवान,रशीद बागवान,शाकेर शेख,नवीद शेख, इस्माईल बागवान, शेख तोसीफ, समीर बागवान, इरफान पटेल,फारुख बागवान नसीर बागवान, मोहम्मद शेख, जुनेद शेख, तोहीद बागवान, अबुजर शेख,अजहर शेख, राजासाब बागवान, सद्दाम शेख,अकरम शेख, मुजीब शेख, अहेमद बागवान, तोहीद पटेल, शारुख सय्यद,रौफ बागवान, सोहेल शेख, रसुल पटेल, महेबुब, सलीम, खय्युम आदि उपस्थित होते.

Advertisement

Advertisement