बीड - बीडचे सीएस डॉ. सुरेश साबळे यांच्या निलंबनाची घोषणा आरोग्य मंत्री सावंत यांनी केल्यानंतर याचे संतप्त पडसाद बीड जिल्ह्यात उमटत आहेत. बीडमध्ये सामाजिक संघटनांनी रस्त्यावर उतरत डॉ. सुरेश साबळे यांच्या समर्थनात घोषणाबाजी केली. तसेच तानाजी सावंतांच करायचं काय? खाली मुंडके वर पाय च्या घोषणा दिल्या.
बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक संघटना आणि नागरिक आक्रमक झाले आहेत. तर सकाळी परिचारीकांनी देखील आंदोलन केले. रुग्णवाहिका चालक देखील या आंदोलनात उतरले असून डॉ. साबळे यांच्या निलंबनाचा सर्व स्तरातून निषेध होत सरकार विरोधात संताप व्यक्त होत आहे.
बातमी शेअर करा